अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून आयपीसी ३७६ कलम ३, ४ अंतर्गत दोडवाड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणातील फिर्यादीच्या म्हणण्यानुसार एक वर्षांमागे फिर्याद दाखल करण्यात आलेल्या महिलेच्या पतीचे निधन झाले. अत्याचार करण्यात आलेली मुलगी हि शालेय शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहावयास होती. परंतु लॉकडाऊनमुळे ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद असल्याकारणाने संबंधित मुलगी हि आपल्या आईजवळ रहायला होती.
यादरम्यान मेहबूबसाब बाबासाब हदीमनी (रा. बेळवडी ता. बैलहोंगल) या इसमाने पैशाचे आमिष दाखवून या अल्पवयीन मुलीला दुकानात पाठवले. त्यानंतर पुन्हा पैसे देऊन आपल्या घरी बोलावले. या दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून यासंदर्भात मुलीच्या आईने दोडवाद पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती.
यासंदर्भात अन्वेषक राघवेंद्र बी. हवालदार यांनी मा. तृतीय जिल्हा आणि सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. मा. न्यायाधीश मंजाप्पा हनुमंतप्पा अन्नयन्नावर यांनी या प्रकरणाचा अभ्यास साक्षी पुराव्यांसह आरोपी मेहबूबसाब बाबासाब हुदिमनी याला पॉक्सो कायद्यांतर्गत ३ वर्षाचा कारावास आणि ५००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.