भरदिवसा खिडकीचे गज कापून दहा लाखांची घरफोडी करण्यात आली आहे. रक्षक कॉलनी विजयनगर येथे ही घटना घडली आहे. चोरट्यांनी तिजोरीतील दहा लाख रुपये रोख रक्कम लांबवली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान शहर व उपनगरात चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. गुंडू पिराजी चौगुले वय 61 यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. आपल्या जावयाच्या घरी त्यांनी रक्कम ठेवली होती. ही रक्कम जमीन खरेदीसाठी जावयाकडे देण्यात आली होती.
मात्र चोरट्यांनी भरदिवसा खिडकीचे गज कापून ही रक्कम लांबविले आहे. या घटनेची माहिती मिळतात गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याच बरोबर खडे बजारचे एसीपी चंद्रप्पा पोलीस निरीक्षक संतोष कुमार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
घरातील मंडळी एका नात्यातील मुलाच्या वाढदिवसासाठी गेली होती हीच संधी साधून चोरट्यांनी आपला डाव साधला आहे. तिजोरीत ठेवण्यात आलेले दहा लाख रुपये दिले आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. शहर व उपनगरात चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.