कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारणारे परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी चक्क बसचे स्टेअरिंग हाती घेऊन सर्वांना चकित केले आहे.
आपण कोणत्या पदावर विराजमान आहोत याचा विचार बाजूला सारून आपल्या खास शैलीत त्यांनी आज बस चालविली.
बंगळूरमध्ये आज इलेक्ट्रिक बस परिवहनाला चालना देण्यात आली. यादरम्यान परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी उपस्थित होते. या वाहनाला चालना देताना बसड्रायव्हरला थांबवून स्वतः बसचे स्टेअरिंग हाती घेऊन बंगळूरच्या शांती नगर येथील बीएमटीसी बसस्थानकापासून ते विधानसौधपर्यंतचा टप्पा बंगळूरच्या रहदारीतून लक्ष्मण सवदी यांनी पार केला.
आपण सर्वांपेक्षा वेगळे आहोत आणि आपली शैलीही वेगळी आहे अशा पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना आश्चर्य चकित केले.
यावेळी विधानसौधमध्ये उपस्थित असलेले मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी इलेकट्रीक बससह लक्ष्मण सवदी यांचे कौतुक केले. यावेळी बीएमटीसी अध्यक्ष नंदिश रेड्डी, केएसआरटीसी व्यवस्थापक निर्देशक शिवयोगी कळसद, बीएमटीसीचे अधिकारी उपस्थित होते.