संजीवनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवार दि. 25 ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी 12 ते 4 या दरम्यान ग्लास , बुडा स्कीम, विनायक नगर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना काळात अनेकांना रक्ताची कमी भासत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. हि गरज ओळखून संजीवनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे रविवारी सायंकाळी 4 वाजता ‘जीवनदान’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. नेत्रदान, त्वचादान, अवयवदान व देहदान या विषयावरील या पुस्तकात देह व वरील अवयव दान कोण करू शकतो, केंव्हा करू शकतो, त्यासाठी काय केले पाहिजे, ब्रेनडेड म्हणजे काय अशा आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे व अनेक गैरसमज पुस्तकाच्या माध्यमातून दूर करण्यात आले असून अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
सध्याच्या परिस्थितीत नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान याची माहिती समाजाला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ट्रस्टचे कार्यकर्ते बाळासाहेब पाटील (मोबाईल ९६३२११२६२७) व संजीव देसाई (मोबाईल 98706 ८८२६०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.