काळ्या दिना बाबत पोलीस अधिकाऱ्यांनी समिती नेत्यांशी बैठक केली सोमवारी मार्केट ए सी पी यांच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यातआले होते.
कोविड काळात शासना कडून कोणत्याच मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही त्यामुळे समितीने देखील या वर्षीची 1 नोव्हेंबर काळ्या दिनाची सायकल फेरी रद्द करावी यावर आपले म्हणणे मांडा अशा सूचना केल्या त्यावर दसऱ्या नंतर 28 तारखे पर्यंत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन समिती आपली भूमिका जाहीर करेल असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
कोविड परिस्थिती असली तरी देशात अनेक मोठी आंदोलन होत आहेत केंद्र सरकारच्या भाषावार प्रांत रचनेस विरोध करण्यासाठी केंद्रा विरोधात हे मराठी जनतेचे आंदोलन असते घटनेने आंदोलन करायचा अधिकार प्रत्येक भारतीयाला दिला आहे असे मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितले तर 1956 पासून आज पर्यन्त बेळगावातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक नव्हे तर केंद्राच्या विरोधात आंदोलन करत आलेत त्यामुळे अधिकाऱ्यांनी हे आंदोलन राज्य सरकार विरोधात नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन मालोजी अष्टेकर यांनी केले.
जर परवानगी दिली नाही तर गल्लो गल्लीत एकत्र जमून युवक निषेध नोंदवायाच्या तयारीत आहेत संविधानात्मक अधिकारा नुसार आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे त्यामुळे शासनाने याचा विचार करावा असे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले.
त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी यावर्षी राजयोत्सव देखील अत्यंत साधेपणाने होणार आहे कोणतीच मिरवणूक काढली जाणार नाही मराठी भाषिकांनी देखील मिरवणूक काढू नये त्यावर आपलं म्हणणं मांडा असे म्हणताच सामाजिक भान ठेवून कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे समिती तर्फे सांगण्यात आले.
मार्केट ए सी पी सदाशिव कट्टीमनी,खडे बाजार ए सी पी चंद्रप्पा आणि शहरातील पोलीस स्थानकांचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते.