बिम्स समोरील चौकामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत होत्या. दरम्यान या ठिकाणी सिग्नल बसवण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र आता प्रशासनाने या ठिकाणी सिग्नल बसून वाहतुक सुरळीत होईल अशी व्यवस्था करून दिली आहे.
संबंधित चौकातील सिग्नल नसल्यामुळे सदाशिवनगर कोल्हापूर रोड व चन्नम्मा चौका पासून येणारी वाहने याठिकाणी येऊन थांबत होती मात्र अनेक जण सिग्नल नसल्याने वाहने तसेच रेटून कोंडी करत होते. त्यामुळे प्रवास करताना मोठी कोंडी निर्माण व्हायची. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडत होते.
याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि येथे सिग्नल बसवावेत अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर एक रहदारी पोलीस याठिकाणी नेमावा अशी मागणी प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसवून वाहतूक रहदारी पोलिसांनी एक पोलिसही तैनात केला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याचबरोबर हा सिग्नल कायम सुरू ठेवावा अन्यथा पुन्हा कोंडी होण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा सिग्नल कायमस्वरूपी सुरू ठेवावा अशी मागणी होत आहे.