बेळगाव जिल्ह्यातील वनक्षेत्रात तस्करीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वनविभाग पोलिस दक्ष झाले असून मागील महिन्याभरात तीन ते चार तस्करीची प्रकरणे रोखण्यात आले आहेत नुकतेच कासवाची तस्करी करुन तो विक्रीसाठी नेताना वनविभागाच्या पोलिसांनी त्या ठिकाणी धाड घातली. यामुळे कासव तेथेच सोडून संशयित आरोपीने पलायन केल्याची घटना हिरेबागेवाडी जवळ घडली आहे.
या प्रकाराने स्करी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत वन्यप्राण्यांच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून पोलीस सज्ज झाले आहेत. संशयित आरोपी विरेश बसय्या हिरेमठ ( वय 28, रा. तुरकर शिगीहळ्ळी, ता. बैलहोंगल ) असे पलायन केलेल्याचे नाव आहे.
विरेश हा कासव तस्करी करत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, हवालदार आर. बी. यरनाळ, के. डी. हिरेमठ, बी. बी. इंगळगी यांनी हिरेबागेवाडी गावाजवळ अचानक धाड टाकली. वन विभागाच्या पोलिसांना पाहताच विरोश हा कासव तेथेच सोडून पोबार केला.
पोलिसांनी कासव ताब्यात घेतला आहे. फरारी झालेल्या आरोपी विरेश हिरेमठ याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून वन विभागाचे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कासव खवल्या मांजर यासह इतर प्राण्यांच्या तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान पोलिस त्याच्यावर कारवाई करून त्यांच्या मुसक्या वळताहेत.