मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी नंतर महापुराच्या विळख्यात अनेक पिके ओलिताखाली आली होती. त्यानंतर सातत्याने एकामागून एक असे संकट ओढवणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एक नवे संकट ओढवले आहे.
बेळगाव तालुका भागातील येळ्ळूर शिवार व परिसरातील शहापूर,धामणे,अनगोळ भागातील शेती ही बासमती भातासाठी प्रसिद्ध आहे.
बेळगावयेथील सुपीक जमीनीतील बासमतीला चांगली मागणी असल्याने बहुसंख्य शेतकरी याच भाताची पेरणी करतात. परंतु या पिकावर करपा रोगाचे सावट पसरले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीने क्वचित पीकं मिळाली होती. त्यात यावर्षीच्या अतिवृष्टीनेही अर्धीच पिके वाचली आहेत. या उर्वरित पिकावरही करपा रोगाने पीक खराब झाले आहे. त्यात कहर म्हणजे परतीचा पाऊस. परतीच्या पावसामुळे संपूर्ण पिकांपैकी २५ टक्के पीकही हाती येण्याची शाश्वती नाही.
या पिकाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना 25-30 हजार रुपये खर्च येतो. त्यांच्या कष्टाला मदत मिळवून देणे, हे आपले कर्तव्य आहे, याचा विचार करुन येळ्ळूर कृषी पत्तीन सोसायटी, माजी ग्रामपंचायत सदस्यांनी शेतकऱ्यांना एकत्रित आणून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर होते.