ही कथा आहे “जुली” या कुत्र्याची ज्याच्यात सजीवांच्या बाबतीत मनुष्य पेक्षाही जास्त माणुसकी आहे. बंटी आणि बबली या कडकनाथ कोंबडा व कोंबडीच्या आपल्या कुटुंबातील समावेशामुळे लेले ग्राउंड टिळकवाडी शेजारी राहणाऱ्या जुली या कुत्र्याची जबाबदारी जणू अधिकच वाढली आहे.
बंटी आणि बबली जर असुरक्षित असतील तर जुली अधिकच त्रस्त आणि क्रुद्ध होते.
बंटी आणि बबली या कोंबड्याबाबतची जुलीची काळजी स्थानिक रहिवाशांसाठी अवाक करणारी असून संबंधित कडकनाथ कोंबड्यांच्या जोडीबद्दल जुलीला असलेली माया आणि प्रेम याचे सर्वांना कौतुक वाटते.
सध्या रेल्वे ग्राउंड परिसरात जुली ही चर्चेचा विषय झाली आहे. जुलीचे मालक संतोष दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जुली ही ही अवघ्या अडीच वर्षाची असून तिला हिंसा आणि भांडणे अजिबात आवडत नाहीत. एखादी व्यक्ती किंवा प्राणी दुसऱ्याला त्रास देत असेल तर तिला ते अजिबात खपत नाही.
कोंबड्याची काळजी घेण्याच्या सदर कुत्र्याच्या विलक्षण दृष्टिकोनासंदर्भातील सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय झाला आहे. कोंबड्यांची काळजी घेण्याची जुलीची वृत्ती पाहता सध्याच्या परिस्थितीत माणसांपेक्षा कुत्र्यांमध्ये अधिक माणुसकी आहे, असे मत जुलीला पाहणाऱ्यांमध्ये व्यक्त होत असते.