Saturday, January 4, 2025

/

न्यायालयं झाली सुरू: नव्या नियमांमुळे पक्षकारांमध्ये मात्र गैरसमज

 belgaum

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या कांही महिन्यापासून बंद असलेली राज्यातील न्यायालयं आजपासून सुरू झाली आहेत. त्यानुसार बेळगांव न्यायालय देखील सुरू झाले असले तरी याठिकाणी न्यायव्यवस्थेने कोरोनाच्या बाबतीत फक्त स्वसंरक्षणाची काळजी घेतल्याचा आरोप करणाऱ्या पक्षकार व साक्षीदारांमध्ये याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेले बेळगाव न्यायालयाचे कामकाज आज सोमवारपासून सुरू झाले आहे. तथापि कोरोनाच्या बाबतीत अद्यापही खबरदारी घेतली जात असून फक्त पाच साक्षीदारांना आत घेतले जात आहे. मात्र न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी संबंधित साक्षीदारांना गेल्या 48 तासात मिळालेले कोरोना पॉझिटिव्ह प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. साक्षीदारांना हा नियम असला तरी वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मुक्त प्रवेश दिला जात असल्याने साक्षीदारात सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे आजतागायत जवळपास चौदा वकिलांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे बरेचसे न्यायालयीन कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरले आहेत. ही वस्तुस्थिती असताना वकील आणि कर्मचाऱ्यांना तपासणी विना न्यायालयात प्रवेश दिला जात आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब खरंतर गंभीर आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्रत्येक न्यायालयात पॉलिथिन वगैरे लावून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मास्क – सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन केले जात आहे. न्यायव्यवस्थेकडून घेण्यात आलेली ही काळजी प्रशंसनीय असली तरी जर न्यायालयात काम करणारा एखादा वकील अथवा कर्मचारीच कोरोना बाधित असेल तर त्यामुळे होणार्‍या परिणामांना कोण जबाबदार राहणार? असा सवाल केला जात आहे. तसेच न्यायव्यवस्था फक्त स्वतःच्या सुरक्षततेचीच काळजी घेत आहे की काय? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

न्यायालयातील प्रवेशासाठी साक्षीदारांची कोरोना तपासणी होत असेल तर न्यायालयीन कामकाजात भाग घेणाऱ्या सरसकट सर्वांचीच तशी तपासणी होणे आवश्यक आहे, असे कांही ज्येष्ठ अनुभवी वकिलांचे मत आहे. सध्या साक्षीदारांची कोरोना तपासणी केली जात असून यासाठी 48 तासात केलेला कोरोना चांचणीच्या पॉझिटिव्ह अहवालाची मागणी केली जात आहे. ही प्रक्रिया या अशीच सुरु राहिली तर साक्षीदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण खटल्यांच्या तारखा एकावर एक लांबणीवर पडत असतात. तेंव्हा प्रत्येक वेळी संबंधित साक्षीदारांना कोरोना पॉझिटिव्ह प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे जे त्यांच्यासाठी त्रासदायक तर ठरणारच आहे शिवाय त्यांना प्रत्येक वेळी कोरोना तपासणीसाठी पैशाचा भुर्दंडही सहन करावा लागणार पक्षकार व साक्षीदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.Court rush

दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे न्यायालयाचे कॅन्टीन बंद आहे. आजपासून न्यायालय सुरू झाले असले तरी कॅन्टीन बंद राहिल्यास विशेष करून परगावाहून येणाऱ्या पक्षकार, साक्षीदार आणि वकिलांची गैरसोय होणार आहे. न्यायालयाचे ग्रंथालय देखील अद्याप बंदच आहे. त्यामुळे संदर्भ आदी मिळवण्यासाठी वकिलांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

ग्रंथालय याप्रमाणेच बार असोसिएशनचे कार्यालय देखील बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी वकिलांच्या विश्रांतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व समस्यांमुळे आज न्यायालय आवारामध्ये गोंधळाचे वातावरण पहावयास मिळत होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.