बेळगावमधील भाग्यनगरमधील सहावा आणि सातव्या क्रॉसजवळ साळींदर निदर्शनास आले. या साळींदराला पकडून सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले.
हे साळींदर या परिसरात संचार करत आहे, याची माहिती येथील स्थानिकांनी बेळगाव परिसराच्या अरण्याधिकाऱ्यांना दिली होती.
त्यानंतर अरण्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ याठिकाणी येऊन या साळींदराला पकडले. त्यानंतर सहाय्यक अरण्य संरक्षणाधिकारी एम. बी. कुसनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या साळींदराला खानापूर येथील जंगलात सुखरूपपणे सोडण्यात आले.
डीसीएफ एम. व्ही. अमरनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ शिवानंद मगदूम, डीआरएफओ विनय गौडर, महम्मद किल्लेदार आणि कर्मचाऱ्यांचा यात सहभाग होता.