जांबोटी येथे चरस-गांजाचा साठा करून, विक्री करणाऱ्या महिलेला खानापूर पोलिसांनी आज अटक केली आहे.
याबद्दल ठोस माहिती मिळताच खानापूरचे सीपीआय रमेश शिंगी यांनी संबंधित महिलेच्या घरावर छापा टाकून करून संबंधित महिलेला अटक केली आहे. यासोबतच ५,१२० रुपये किमतीचा ५११ चरस-ग्राम गांजा आणि रोकड ताब्यात घेतली आहे.
प्रतिभा प्रभाकर बिर्जे असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून हल्याळ तालुक्यातील चिब्बलगेरी येथे राहणाऱ्या लक्ष्मण सहदेव हुंडलेकर या व्यक्तीकडून गांजा आणल्याची माहिती तिने दिली आहे. त्यानंतर लागलीच पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या घरावरही छापा टाकून २५०० रुपये किमतीचा २२० ग्राम गांजा जप्त केला आहे. संबंधित आरोपींकडून पिकविण्यात येणाऱ्या चरस-गांजाची रोपेही हस्तगत करण्यात आली आहेत.
सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.