मागील दोन-तीन वर्षांपासून येथे एपीएमसी पर्यंत या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत. पहिलाच नागरिकांच्या नाराजीचा सूर उमटत असताना नुकतीच या रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
अडत व्यापारी सचिन हिरामणी बामणे वय 40 राहणार संगमेश्वर नगर असे त्या दुर्दैवी चे नाव आहे. हा रस्ता व्हावा यासाठी वारंवार निवेदने आंदोलने आणि रस्ता बंद असे वेगवेगळे पर्याय करून झाले आहेत. मात्र मुर्दाड प्रशासनाला याची काहीच काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.
एपीएमसी ते कंग्राळी पर्यंतच्या रस्त्याचे काम मागील दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र हा रस्ता करण्याकडे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावरचा पहिला बळी अडत व्यापारी यांचा गेला आहे. अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मात्र प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याऐवजी दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे हा रस्ता कधी होणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
संगमेश्वरनगर एपीएमसी आणि रस्त्याची वाताहत झाली आहे असुन प्रशासन किती जणांचा बळी घेणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे काम तातडीने करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.