सध्या वेगवेगळ्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असली तरी आता या निवडणुकीच्या धुरळा लवकरच सुटणार आहे. बेळगाव जिल्ह्यासह राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच बरोबर प्रलंबित असलेल्या निवडणुकाही तातडीने घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाने सुरू केले आहेत.
दरम्यान ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर तालुका पंचायत आणि त्याआधी महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणुक घेण्यासाठी आतापासून हालचाली गतिमान केले असून प्रारंभी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडवण्यात येणार आहे. त्यानंतर महानगरपालिका आणि तालुका पंचायत याचबरोबर जिल्हा पंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.
त्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबतची सर्व ती तयारी सुरू केली आहे. मतदार याद्या जाहीर करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीमुळे या निवडणुकांना काहीशी खीळ बसली होती.
मात्र आता पुन्हा निवडणूक आयोगाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे विशेष करून निवडणूक आयोग ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर लवकरच तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर महानगरपालिकांचे ही खलबते सुरू आहेत. आतापासूनच ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.
दरम्यानच्या काळात जर या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या तर अनेकांचा हिरमोड होणार आहे तर काहीच्या पार्ट्यांचे पैसे वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान येत्या दोन महिन्यात निवडणुका होणार असे भाकीत निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे आता लागोपाठ निवडणुकींचा धुरळा उडणार आहे यात मात्र शंका नाही.