दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव मंदिराजवळ घडली आहे.
राजेश्री रवी बन्नूर वय 21 रा.काळेनट्टी वाघवडे, रोहिणी गंगप्पा हुलमनी वय 21 रा. काळेनट्टी वाघवडे असे या घटनेत झालेल्या मयत महिलांची नावे आहेत.घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून तपास सुरू आहे.
घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार दोन महिला वाकिंग करत होत्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकून त्यांचा खून केला व पलायन केले या खूनी हल्ल्यात दोघींचाही घटनास्थळी मृत्यू झाला.
या घटनेतील दोन्ही पैकी एक मयत महिला विवाहित असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे मच्छे येथील ब्रह्मदेव मंदिराजवळ वाकिंग करत होत्या त्यावेळी दुचाकी वरून आलेल्या युवक हल्लेखोरांनी त्यांच्या चाकूने हल्ला केला त्यात दोघींचा मृत्यू झाला आहे.घटनास्थळी मच्छे येथील लोकांनी गर्दी केली होती.ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक आणि सहकाऱ्यांनी पंचनामा करत अधिक तपास सुरू केला आहे.
![Machhe murder](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/09/IMG-20200926-WA0274.jpg)
पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे.सदर खून नेमका कुणी केला कशासाठी केला नेमकं कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.याबाबतची अधिक माहिती देखील पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे.