Monday, December 30, 2024

/

बेळगावला आलेल्या मंत्र्याला झाली कोरोनाची बाधा

 belgaum

गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगावला आलेले मंत्री के एस ईश्वरप्पा हे कोरोना पोजिटिव्ह आले आहेत त्यामुळे बेळगावात त्यांना भेटलेल्या अधिकारी आमदार मंत्र्यांना देखील क्वांरंटाइन व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पिरनवाडी येथील संगोळळी रायन्ना यांच्या पुतळ्याच्या वाद प्रकरणी ईश्वरप्पा यांचा बेळगाव दौरा झाला विमानतळ सर्किट हाऊसला भेट दिली होती तसेच पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याला हार घातला होता.

यावेळी ईश्वरप्पा यांच्या सोबत अनेक अधिकारी व समर्थक देखील उपस्थित होते इतकेच काय तर ईश्वरप्पा आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची गळा भेट देखील झाली होती त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्याना काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोना फायटर म्हणून लढणाऱ्या डॉक्टर पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असताना राजकारणीही त्यातून सुटले नाहीत मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा पासून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनाही कोरोनाची बाधा झाली होती.

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी कोरोनाच्या बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अनेकांनी काळजी न घेता गर्दी केलेली चित्र पहावयास मिळाली आहेत अश्या वेळी पुन्हा प्रशासनावर ताण येऊ शकतो जर का अधिकारी क्वांरंटाइन झाले तर कायदा सुव्यवस्था अडचणी येऊ शकते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.