Sunday, December 22, 2024

/

जुगार खेळणारे 25 जणांना अटकेत

 belgaum

चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे नाईकवाडी कौलारू घरांमध्ये तीन पाणी जुगार खेळण्यात येत होता. या प्रकरणी बेळगाव येथील एकवीस जणांसह एकूण 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आठ लाख 98 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेने बेळगाव परिसरात खळबळ माजली आहे. जुगार अड्ड्यावर छापा पडतात अनेकांची पाचावर धारण झाली आहे.

अशा परिस्थितीत बेळगाव येथील जुगारी आता चंदगड तालुक्यात जाऊन आपला डाव मांडत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अजूनही कारवाई होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. यामागेही पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी अशीच कारवाई केली होती.

कुद्रेमनी परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याने त्यांनी ही कारवाई केली होती. आता बेळगाव येथील जुगारी खेळणारे चंदगड तालुक्यात जाऊन जुगार खेळत असल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युवराज कृष्णा नाईक यांच्या राहत्या घरात जुगार सुरू होता. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

बेळगाव येथील सुनील कल्लाप्पा कोळी राहणार कंग्राळी, राम बाळकृष्ण नीलजकर राहणार कंग्राळी, मल्लिकार्जुन तुकाराम कांबळे राहणार शाहूनगर, शिवानंद यल्लाप्पा गडकरी राहणार शाहूनगर, राहुल भैरव राजगोळकर राहणार गांधीनगर, यल्लाप्पा परशुराम जाधव राहणार बेनकनहल्ली, बसवंत बाळू पाटील राहणार आंबेवाडी, सुनील कल्लाप्पा पाटील राहणार जाफरवाडी, पवन सुरेश शिंदे राहणार हिंडलगा, तौसिफ मोहम्मद मुल्ला राहणार हिंडलगा हनुमंत नागाप्पा हूकडे राहणार कंग्राळी, सुशांत कामांना कडोलकर राहणार बॉक्साइट रोड, गिरीश नागेश खर्डेकर राहणार कंग्राळी, नागराज जयवंत नांदुरकर राहणार कंग्राळी, विनायक रघुनाथ सुतार राहणार हिंडलगा, झाकीर हुमायून मुल्ला राहणार हिंडलगा, अखिलेश महादेव भादवणकर राहणार बेळगाव, समयलाल पाल राहणार बेळगाव, किरण शिवाजी बाचीकर राहणार शहापूर, सुरेश संकपाळ राहणार हिंडलगा आणि प्रताप परिश्रम जुवेकर राहणार बेळगाव अशी बेळगाव येथील जुगार खेळणाऱ्याची नावे आहेत.

या कारवाईमुळे बेळगाव शहर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. अजूनही काही जण चंदगड तालुक्यात जुगार खेळण्यासाठी जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.