मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून सरी कोसळत होत्या. मात्र आता मंगळवारी पावसाने रिपरिप सुरू ठेवली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी पहाटे पासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शहरासह तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे.
तर काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचा जोर वाढला असून शेतकरी चिंतातुर आहेत. मागील दोन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू होती. मात्र आता मंगळवारी पहाटेपासूनच संततधार सुरू झाल्याने पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
काही ठिकाणी भात पोसवणीला आले आहे तर अजून काही ठिकाणी यायचे आहे. मात्र ज्या ठिकाणी भात पोसवनी होत आहे ही भाते धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस सध्या तरी नको रे बाबा अशीच मागणी शेतकरी करू लागले आहेत. संततधार सुरू असल्याने आता छत्री व रेनकोटचा आधार घेऊनच बाहेर पडावे लागत आहे.
मागील दोन दिवसांपासून पाऊस अधूनमधून पडत होता. मंगळवारी मात्र सकाळपासूनच पावसाने रिपरिप सुरू ठेवले आहे. तालुक्यातील काही शेतकरी बटाटा व रताळी काढण्याच्या कामात गुंतले आहेत.
काही पिकांना हा पाऊस मारक तर काहींना लाभदायक ही आहे. मात्र बटाटा व रताळी काढण्याच्या कामात हा पाऊस व्यत्यय निर्माण करत आहे. त्यामुळे सध्या तरी पाऊस नको रे बाबा असेच म्हणण्याची वेळ आली आहे.