प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता २१ सप्टेंबरपासून क्लोन ट्रेन्सच्या २० जोड्या (४० ट्रेन्स) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लोन ट्रेन्स निवडक मार्गांवरच धावणार आहेत. मंत्रालयाने अधिकृतरित्या सांगितले की काही निवडक मार्गांवरील मोठी मागणी पाहता रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या आठवड्यात भारतीय रेल्वेने प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी त्याच मार्गावर विशेष क्लोन ट्रेनची घोषणा केली होती ज्या मार्गावर सामान्यतः प्रवाशांची खूप गर्दी असते. या क्लोन किंवा डुप्लिकेट ट्रेन्स प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी अधिक मागणी असलेल्या मार्गांवर धावतील.
सरकारने याआधी सांगितले होते की प्रस्तावित ट्रेन्समुळे जास्त मागणी असलेल्या ट्रेन्सची उपलब्धता वाढण्यासोबतच राष्ट्रीय दळणवळणाचे राजस्व वाढण्यातही मदत होईल, ज्यावेळी या क्षेत्राची कमाई कोव्हिड-19च्या संकटामुळे घटलेली आहे.
बेळगाव रेल्वेस्थानकावरून व्हाया बेळगाव – मिरज आणि पुणे अशा २ रेल्वे धावणार असून यशवंतपूर – निजामुद्दीन, गाडी क्रमांक ०६५२३ ही रेल्वे दुपारी १.५५ वा. सुटेल. ही गाडी बुधवार आणि शनिवारी उपलब्ध असणार आहे. यासोबत गाडी क्रमांक ०६५२४ ही रेल्वे निजामुद्दीन स्थानकावरून शनिवारी आणि मंगळवारी उपलब्ध असेल.
https://www.instagram.com/p/CFPR5MGBvAD/?igshid=vposbo2v4txo
वास्को – निजामुद्दीन गाडी क्रमांक ०७३७९ ही रेल्वे शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता सुटणार आहे तर रेल्वे क्रमांक ०७३८० ही गाडी निजामुद्दीन स्थानकावरून रविवारी दुपारी १.०० वाजता सुटेल. बेळगाव स्थानकावरील रेल्वेचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.
भारतीय रेल्वेने २५ मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या होत्या. यापूर्वी क्लोन गाड्या भारतीय रेल्वेने चालवल्या नव्हत्या. प्रस्तावित असलेल्या क्लोन गाड्या वेगवान वाहतुकीच्या वेळेच्या नियोजनासह निवडक स्थानकांवर थांबणार आहेत.