सध्या विकलेल्या पत्रकारितेच्या जमान्यात ज्यावेळी प्रामाणिक पत्रकाराकडे बोट दाखवले जाते त्यावेळी साहजिकच त्याची अस्मिता जागी होते.अर्णव गोस्वामी याचे ठराविक विचार धारेशी अभद्र युती केलेले चॅनल बेताल झाले आहे.पत्रकारितेचा त्यांच्या कडून कडेलोट होत आहे.
एकंदर सामान्य माणूस ज्यावेळी ते चॅनेल बघतो त्यावेळी येथील अकांडतांडव करणारे पत्रकार पाहिले की त्याला शिशारी येऊ लागते. याच अर्णव गोस्वामीच्या पत्रकारितेतून बाहेर आलेली पिल्लावळ देशभर कोरोना सारखी पसरत चालली आहे.त्यांना ना भान आहे ना कुणाला ध्यायचा मान आहे केवळ पैश्याने विकलेली पत्रकारिता करणे एवढेच काम आहे.
असाच एक प्रसंग रिपब्लिक चॅनेलचा पत्रकार मुंबईतील मराठी पत्रकारांना हिणवून ‘तुम्ही तर चाय बिस्कीट’वाले पत्रकार आहात असे म्हणाला त्यावेळी पत्रकार विनोद जगदाळे आणि इतर मराठी पत्रकारांनी गोस्वामीच्या पत्रकाराचं थोबाड फोडलं.ही प्रतिक्रिया रिपब्लिक चॅनेलच्या बाबतीत सामान्य मराठी माणसाची आहे.
या घटनेबाबत सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड सुरू असून अनेकानी डी पी, स्टेटस व टीका टिपणी करत गोस्वामीचा समाचार घेतलाय इतकेच काय तर चहा आणि बिस्कीट पत्रकारांना पाजवणे त्याचे फोटो व्हायरल करणे असे मराठी अस्मितेचे ट्रेंड गाजू लागले आहेत.
वरील घटनेसाठी मराठी अस्मिता जपणारे बेळगाव येथील बापट गल्लीतील कालिका देवी युवक मंडळाने बेळगावातील पत्रकाराना चहा बिस्किटाचा कार्यक्रम आयोजित करून निर्भीड, निपक्ष आणि बेडर पत्रकारितेचा पुरस्कार करून मराठी पत्रकारितेचा गौरव केला आहे.बापट गल्लीतील पत्रकारांना चहा बिस्किटे देण्याच्या कार्यक्रमावेळी सुनील केसरकर भाऊ किल्लेकर, प्रकाश राऊत,अंकुश केसरकर अमोल केसरकर आदीं उपस्थित होते.वर्तमान पत्र आणि डिजिटल मीडियाचे पत्रकार यावेळी उपस्थित होते.