दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी दिली आहे.
21 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 38 व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 43 परीक्षा केंद्रावर पुरवणी परीक्षा होणार आहे. त्या अनुषंगाने या परिसरात कोणताही गैरव्यवहार रोखण्यात आणि कॉपी टाळण्यासाठी 81 परीक्षा केंद्रावर जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याची दखल पालकांनी व इतरांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 1.45 व दुपारी 2.30 ते सायंकाळी 05:45 या वेळेत दहावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर 21 ते 28 सप्टेंबरपर्यंत परीक्षा केंद्रावर 200 मीटर अंतरापर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रावर पाचशेहून अधिक जणांनी गटागटाने थांबू नये विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने परीक्षा घेण्यात येऊ नये असेही आदेशात म्हटले आहे. विद्यार्थी कर्मचारी अधिकारी व पोलिस वगळता इतरांना शाळा आवारात प्रवेश बंदी असणार आहे.
त्यामुळे याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. परीक्षा केंद्र जवळ सभा समारंभ मिरवणूक यावरही बंदी असणार आहे. असे प्रकार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.