बेळगाव तालुक्यातील अतीवाड येथे एका अकरा वर्षे मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत. रविवारी दुपारी दोन ते साडेचार या वेळेत आत्महत्येचा प्रकार घडला आहे. यासंबंधी काकती पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असली तरी या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही.
पोलीस स्थानकात सीआरपीसी कलम 174सी अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हाडूर पुढील तपास करीत आहेत. आत्महत्या केलेल्या मुलीचे वडिलांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. सदर मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करून घेतली आहे.
या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. संबंधित मुलीचे वडील हे हॉटेल व्यावसायिक आहेत. होनगा परिसरात त्यांचे हॉटेल आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.