अनेक कोविड रुग्णांचे जीव वाचवण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे राज्य आणि केंद्र सरकार कडून कोविडसाठी मिळणारा निधी कुठे जातोय असा प्रश्न जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी उपस्थित केला आहे.
शुक्रवारी जिल्हा पंचायतीत सभेचे आयोजन करण्यात आले होते.कोविडसाठी केंद्रा कडून आणि राज्य सरकारकडून दिला जाणारा निधी कुठं खर्च केला जात आहे.कोविड वर सिव्हिल व्यतिरिक्त खाजगी इस्पितळात देखील उपचार सुरू आहेत प्रत्येक रुग्णांना दीड लाख रुपये दिले जात आहेत त्यामुळे खाजगी इस्पितळात बोगस नावे घालण्याचे प्रकार देखील वाढत आहेत याची चौकशी करा अशी मागणी पाटील यांनी बैठकीत केली.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड वर उपचार सुरू करा जेणे करून ग्रामीण भागातील जनतेला याचा फायदा होईल असं देखील त्या म्हणाल्या.
गेलेला निधी परत मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा पंचायत सी ई ओ दर्शन यांनी दिले शुक्रवारी जिल्हा पंचायतीत झालेल्या बैठकीत सदस्यांनी काम न करता परत गेलेल्या निधी बाबत बैठकीत जोरदार आवाज उचलत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
केवळ आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीच्या एक कोटी 20 लाख निधी लॅप्स होऊन परत गेला आहे असा विविध खात्यातील निधी परत का गेला?अधिकाऱ्यांनी कामचुकार पणा केला आहे असा आरोप करत अनेक सदस्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
विकासासाठी आलेला निधी परत जाणे ही गंभीर बाब असून यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त करून गेलेला निधी सरकार कडून समन्वय साधून परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन सी ई ओ दर्शन एच व्ही यांनी दिले.