कोरोना काळात शिक्षकावर होणारा अन्याय दूर झाला असून आता पेपर मूल्य मापनासाठी बिदरला जाण्याचा आदेश रद्द झाला आहे. कालच शिक्षक संघटनेने जिल्हा शिक्षणअधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे होते याची दखल घेत सदर आदेश रद्द करण्यात आला आहे.
बेळगांव येथील कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने मा. जिल्हा शिक्षणाधिकारी यांना सोमवार दिनांक २८ सप्टें रोजी दिलेल्या निवेदना नुसार कोरोना काळात शिक्षकावर होणाऱ्या अन्याया विषयी चर्चा करुन पुरवणी परीक्षेसाठी बेळगाव जिल्हातील शिक्षकांना बिदर येथे मूल्यमापनासाठी परीक्षा बोर्डाकडून आलेल्या आदेशाला विरोध केला होता. शासनाने योग्य तो निर्णय न झाल्यास संघाने पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देखील देण्यात आला होता .
पण कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक जिल्हा संघाच्या रेट्याने आणि शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी याची दखल घेत सदर आदेश रद्द केला आहे.
आमदार महांतेश कवठगीमठ, आमदार अरुण शहापूर, आमदार अनिल बेनके त्याच बरोबर राज्याध्यक्ष संदिप बुदिहाळ, राज्य सचिव चिदानंद पाटील आणि बेळगाव जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने हा आदेश रद्द झाला असून आता बेळगावातील शिखस्कन कोरोना काळात मूल्य मापनासाठी बिदरला जाण्याची गरज नाही.
बिदर जिल्ह्यात आलेले बेळगाव जिल्हातील मराठी माध्यमाच्या गणित विषयासाठी मूल्यमापानासाठी आलेला आदेश परीक्षा बोर्डाने रद्द केला असून त्या शिक्षकाना न्याय मिळाला आहे. संघाच्या सहकार्या बद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.