देशासह जगावरच कोरोनाचे संकट दूर कर बेळगावातील कोरोना आटोक्यात आण या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील संकटमोचक असलेल्या सुळेभावी महा लक्ष्मी देवीची विशेष पूजा अभिषेक करून साकडं घालण्यात आलं.
महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार कमिटीच्या नेतृत्वाखाली कमिटी सदस्य आणि पुजाऱ्यानी विशेष पूजेचे आयोजन केले होते कोरोनावर मात करून लोकांना सुख समृद्धी मिळो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
महा लक्ष्मी देवी व्यतिरिक्त श्री कलमेश्वर,श्री वीरभद्रेश्वर,श्री यल्लमा देवी,शाखांबरी देवी, बनशंकरी देवी, दुर्गादेवी श्री गणेश,मारुती,ब्रह्मदेव,विठ्ठल रुखमाई यांच्या नावे देखील अभिषेक घालण्यात आला.
कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे पूर्ण जगावर याचा ताण पडला आहे अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे कुटुंब रस्त्यावर आली आहेत त्यामुळे जनजीवन नियंत्रणात येऊ दे म्हणून आम्ही देवीकडे साकडे घालत विशेष पूजा केली आहे असे मत सुळेभावी ग्रामस्थ बसनगौडा हुंकरीपाटील यांनी व्यक्त केलं.
काही महिने देवीचे मंदिर देखील आम्ही दर्शनासाठी बंद ठेवलं होतं आता एक महिन्या पासून सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायरझर वापरून दर्शन खुल केलं आहे अशी माहिती शशिकांत संगोळळी यांनी दिली.