बेळगावचे भाजप नेते शंकरगौडा पाटील यांची कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहेत त्याचा अधिकाराची सूत्रे मंगळवारी स्वीकारली आहेत. अधिकार ग्रहण केल्यानंतर, दिल्लीच्या कर्नाटक भवनामध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना विशेष सूचना केल्या आहेत.
यावेळी या वेगळ्या माध्यमातून कर्नाटक सरकारचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली येथील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत केंद्र सरकारी आणि दिल्ली कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना कर्नाटक सरकारच्या प्रलंबित प्रकल्पांच्या मंजुरीसह चांगल्या समन्वयासाठी काम करण्याचे निर्देश दिले.
यावेळी विजय रंजन सिंग, दिल्ली कर्नाटक भवनाचे विशेष निवासी आयुक्त प्रसन्न आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.शंकरगौडा पाटील हे भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे राजकीय सचिव म्हणून कार्य केलं आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याच्या पार्थिवावर त्यांनी कर्नाटक सरकारच्या वतीने पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.