विविध शेतकरी संघटनांच्या वतीने सोमवारी २८ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंद दरम्यान कायदा आणि सुव्यस्थेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे.
कोणीही कायदा हाती घेऊन अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सूचनाही एस. पी. निंबरगी यांनी केली आहे.
उद्या चन्नम्मा सर्कलपासून सुवर्णसौधपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यादरम्यान कोविड संदर्भातील एनडीआरएफ मार्गसूचीनुसार सर्व नियम आणि अटी पाळणे बंधनकारक आहे.
आंदोलनकर्त्यांनी शांततेत हा मोर्चा पार पडायचा असून यादरम्यान कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, आणि कायदा हातात घेणाऱ्यांचा कोणताही मुलाहिजा ठेवण्यात येणार नाही.
तसेच बंद दरम्यान सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही, आणि विनाकारण सर्वसामान्य जनतेला वेठीला धरण्यात येऊ नये, अशी सूचना एस.पी. निंबरगी यांनी केली आहे.