स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत दररोज तक्रारी पुढे येत असून या कामकाजावर ताशेरे ओढण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत आरसीनगरमध्ये काम सुरू केले आहे. येथे चक्क गटारीतच विजेचा खांब दिसून येत आहे.
याठिकाणी भूमिगत विजेच्या केबल्स घालण्यात येणार आहेत. परंतु हा खांब हटवून कामकाज करण्याऐवजी गटारीमध्येच खांब जसाच्या तास ठेऊन पुढील काम करण्यात येत आहे.
याविरोधात सोशल मीडियावर चांगलाच हा मुद्दा उचलून धरण्यात आला होता अनेक न्यूज पोर्टलनी याबाबत वृत्तांकन केलं होतं कालच्या बातमीचा सोशल मीडियाचा “इम्पॅक्ट” आज दिसून आला असून येत्या चोवीस तासात हा खांब हटविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे व खांब काढायला देखील सुरुवात केली आहे.
सदर गटारीचे बांधकामही नुकतेच करण्यात आले होते चक्क गटारीत विजेचा खांब बसविण्यात आला होता आणि आता पुन्हा विजेच्या केबल्स भूमिगत घालण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे पुन्हा गटारी खोदा.. पुन्हा खांब काढा.. एकंदर पालथ्या घड्यावर पाणी अशाप्रमाणे करण्यात येणाऱ्या कामात जनतेच्याच पैशांची उधळपट्टी होत आहे.
याबाबत स्मार्ट सिटी एमडींकडे विचारणा केली. आणि त्यांनी हा खांब हटविण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी दुपारी सदर खांब हटवण्यात आला आहे.