Wednesday, December 25, 2024

/

त्या ठिकाणी बसवणार शिवाजी महाराजांच्या नावाचा फलक

 belgaum

पिरनवाडी क्रॉस येथे छ्त्रपती शिवाजी महाराज चौक या नावाचा फलक बसविला जाणार आहे आहे पिरनवाडी ग्रामस्थ आणि ग्राम पंचायतीच्या वतीनं गुरुवारी सकाळी 8 वाजता हा फलक बसवला जाणार आहे.

गेल्या आठवड्यात पिरनवाडी येथील चौकात संगोळळी रायन्ना यांचा पुतळा बसवण्या वरून वाद निर्माण झाला होता हा मुद्दा देशभर गाजला होता अखेर त्या जागेवर करवे कार्यकर्त्यांनी रात्रीच्या अंधारात रायन्ना पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती नंतर ए डी जी पी अमर कुमार पांडे आणि जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी बैठक घेऊन तोडगा काढत हा वाद मिटवला होता.

Piranwadi
Piranwadi

त्या चौकाचे नाव छ्त्रपती शिवाजी महाराज चौक तर पुतळा रायन्ना राहील असा तोडगा काढून अधिकाऱ्यांनी वाद संपवला होता मात्र कालच करवे अध्यक्ष नारायण गौडा यांनी याबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून या भागातील जनतेच्या मनात आणखी तणाव वाढवला होता

मात्र गुरुवारी सकाळी दोन्ही समाज आणि समस्त शिव भक्तांच्या उपस्थितीत या चौकात छ्त्रपती शिवाजी महाराज चौक या नावाचा फलक बसवला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.