राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसारित केलेल्या हेल्थ बुलेटिन नुसार आज जिल्ह्यात १६७ नावे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ५३३ जण आज कोरोनमुक्त झाले आहेत. तर एकूण चार जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दररोजची कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र दिलासादायक आहे. परंतु दुसऱ्या बाजूला नव्या कोरोनारुग्णांची भर दिवसेंदिवस होत चालली आहे.
जिल्ह्यात अजून २७०२ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत १६५४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण मृतांचा आकडा २४१ वर पोहोचला आहे तर अजूनही २५२ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.