21 सप्टेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान विद्यार्थी शाळेत जाण्याची परवानगी नसली तरी शिक्षकाने शाळा भरवण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला होता. त्यामुळे शाळा गजबजणार होत्या. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळांना भेटी देणे आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने हितावह नाही या अनुषंगाने आता शाळा 30 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
त्यामुळे शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत अजूनही दिरंगाई होणार यात शंका नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने शाळा सुरू करण्यासंबंधी 20 ऑगस्ट रोजी मार्ग सूची जारी केली होती. त्यामध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून अभ्यास विषयक मार्गदर्शक शंकानिरसन करून घेण्यासाठी 21 सप्टेंबर पासून शाळा व कॉलेज सुरू करण्याची मुभा देण्यात आली होती.
मात्र कोरूनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात याव्यात असा आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे अजून तरी शाळांचा परिसर सुरू राहणार नाही. विशेष करून नववी ते बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
मात्र सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा सुरू करू नये असा आदेश आल्याने पुन्हा शाळा बंद राहणार आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक जण दगावले आहेत. यातच जर शाळा सुरू करण्यात आल्या तर पुन्हा धोका उद्भवेल या दृष्टिकोनातून सरकारने सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांनाही आणखी काही दिवस शाळा सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.