सदाशिव नगर स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून हा कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. मार्च महिन्यापासून मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून कोविड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा झाला आहे.
मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यावर नातेवाइकांकडून रक्षाविधी आटोपला जातो. तसेच अस्थिविसर्जनासाठीहि विधी करण्यात येतो.
नातेवाईकांकडून रक्षाविधीसाठी जेमतेम रक्षा आणि अस्थी स्मशानभूमीतून घेऊन जाण्यात येतात. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थी आणि रक्षा जशास तशा त्याठिकाणी पडून राहतात. मार्च महिन्यापासून मृतांच्या संख्येत वाढ झाली असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात राख जमा झाली आहे.
याव्यतिरिक्त प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि अंत्यविधीसाठी लागणारे उर्वरित इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे. महानगरपालिकेने या परिसरातील स्वछता करून येथील कचरा त्वरित हटवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.