कोरोनामुळे देशभर करण्यात आलेला लॉकडाऊन हळहळू शिथिल करण्यात येत आहे. परंतु अजूनही कोरोनाची धास्ती कायम आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.
समूह संसर्गाचा धोकाही आता अधिक बळावला आहे. देशभरातील काही रेल्वे सेवाही पूर्ववत सुरु करण्यात आलेल्या आहेत. रेल्वेस्थानकावर गर्दी टाळण्यासाठी रेल्वे विभागाने बंगळूरसह 250 स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ केली आहे.
हे दर १० रुपयांपासून तब्ब्ल ५० रुपये करण्यात आले आहेत. बंगळूरमध्ये यशवंतपूर, कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकावर वाढीव दर आकारण्यास सुरुवात झाली असून तिकिटाशिवाय रेल्वेस्टेशनवर प्रवेश करणाऱ्यांच्या दंडातही वाढ करण्यात आली आहे.
यासंदर्भात बंगळूर प्रादेशिक रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिला असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाययोजना, आणि गर्दीच्या माध्यमातून समूह संसर्ग टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म
तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकावर अद्याप 50 रूपये प्लॅट फॉर्म तिकीट दर वाढवला नसून बेळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅट फॉर्म तिकिट दर दहा रु.इतका आहे.