शहरात रहदारी वाढली असून वाहतूक कोंडीची समस्या नेहमीची झाली आहे. वाढती वाहतूक समस्या लक्षात घेत यावर तोडगा काढण्यासाठी आज रहदारी पोलिसांनी रस्त्याशेजारच्या भाजीविक्रेत्यांवर तसेच इतर छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली. शुक्रवारी सकाळपासून केळकर बाग, समादेवी गल्ली आणि शहरातील इतर भागातील भाजी विक्रेत्यांवर रहदारी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती.
यादरम्यान भाजीविक्रेत्यानी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. अखेर युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजीविक्रेते आणि आमदार अनिल बेनके यांच्यात चर्चा पार पडली. आणि त्यानंतर संपर्क साधून नियमावलीनुसार भाजीविक्रेत्यांना विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भाजीविक्रेत्यानी नियम पाळून भाजी विक्री करण्याची हमी दिल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली.
लॉकडाऊनमुळे आधीच संकटात सापडलेल्या लहान व्यापाऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शनिवारी हा कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने पोटावर पाय देण्याचा प्रकार करण्यात आला आहे, असा आरोप या विक्रेत्यांकडून केला जात आहे.
आमदार अनिल बेनकेंशी चर्चा करण्यात आल्यानंतर रस्त्याशेजारी आखून देण्यात आलेल्या पट्ट्याच्या आत व्यापार-विक्री करावी अशी सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आली तसेच पोलिसांनाही यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.