बेळगाव शहरातील विविध विकास कामांकरिता बुडाने निविदा मागवल्या आहेत. नगर विकास प्राधिकरणाच्या वतीनं शहरातील अनेक रस्ते व उद्याने विकसित केली जाणार आहेत.द्रायव्हर्स कॉलनी येथील रिव्हिजन सर्व्हे नंबर 193 मध्ये 24 लाख 21 हजार खर्चून उद्यान विकसित केले जाणार आहे.
रामतीर्थनगर येथे 24 लाख 41 हजार खर्चून सर्व्हे नंबर 592,593 आणि 597 मध्ये स्कीम नंबर 35,43 आणि43 ए मध्ये विकास केला जाणार आहे.
बुडा कार्यालयांत बुडा कार्यालय दुरुस्तीसाठी 24 लाख 90 हजार रुपये खर्च केले जाणार आहे.इतर खर्च ब्लु टूथ इनसिनेटर आणि इतर कामासाठी म्हणून छ्त्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिव चरित्रात 24 लाख 43 हजार खर्चिले जाणार आहेत.
विविध विकास कामे आणि रस्ते बनवण्यासाठी स्कीम नंबर 56 आणि कुमार स्वामी ले आऊट प्लॉट नंबर 488 ते 487 आणि 473 ते 573 पर्यन्त 19 लाख 29 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
आणखी एका ठिकाणी स्कीम नंबर 56 आणि कुमार स्वामी ले आऊट प्लॉट 421 ते 438,114 ते 128 व 427 ते 429 मध्येविकास कामांना 20 लाख 81 हजार खर्च केले जातील.रामतीर्थनगर येथील उद्यान दुरुस्ती साठी 24 लाख रुपये तर रामतीर्थनगर नगर मधील एस सी एस टी हॉस्टेल मधील अँप्रोच रोडसाठी 24 लाख 99 हजार खर्च होणार आहेत.