एपीएमसी ते संगमेश्वर नगर रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने ही समस्या उद्भवत आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास दुर्लक्ष होत असून याठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.
एपीएमसी बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर या ठिकाणी कांदा मार्केट रताळी मार्केट आणि भाजी मार्केट नव्याने स्थापन झाल्यानंतर येथील वर्दळ वाढली आहे. वाहतुकीची कोंडी होत असल्याने तासन् तास अडकून थांबावे लागत आहे.
याच बरोबर एपीएमसी येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. संगमेश्वर नगर ते एपीएमसी दरम्यानचा रस्ता एका बाजूने झाला असला तरी दुसऱ्या बाजूने अजूनही अर्धवट काम आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या वारंवार घडत आहे.
एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात येत असल्याने ही समस्या उद्भवत आहे. एका बाजूने रस्ता झाला असला तरी अजूनही तो रस्ता अर्धवटच आहे. त्यामुळे एपीएमसी ते सोमेश्वर नगर पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे.
याचबरोबर कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याचे काम दिरंगाईने सुरू आहे. त्यामुळे सोमेश्वर नगर ते कंग्राळी खुर्द रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.