राणी चन्नम्मा विद्यापीठ “या” ठिकाणी होणार स्थलांतरीत-बेळगाव जिल्ह्यातील भूतरामहट्टी येथील प्रतिष्ठित राणी चन्नम्मा विद्यापीठ हिरेबागेवाडी येथे स्थलांतरीत करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे.
राज्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इमारत बांधण्यासाठी हिरेबागेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील 70 एकर सरकारी जमिनीसाठी अनुमती दिली आहे.
मात्र अजूनही मंत्रिमंडळाची परवानगी मिळणे बाकी आहे. पण राणी चन्नम्मा विद्यापीठ हे हिरेबागेवाडी येथे स्थलांतरित होणार हे मात्र नक्की आहे.
हे विद्यापीठ अनेक वर्षे भुतरामहट्टी येथे स्थित आहे. बेळगाव मधील या विद्यापीठ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सोयीचे ठरत होते. याशिवाय अनेक अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि विविध अभ्यासक्रमामुळे या विद्यापीठाचा विस्तार करण्याचा विचार सुरू होता. मात्र भुतरामहट्टी येथील वनविभागाने यासाठी अडथळा निर्माण केला. यामुळे आता विस्तारित जागेत हिरेबागेवाडी येथे हे विद्यापीठ स्थलांतरित होत आहे.