जिल्हा पंचायत राष्ट्रीय पेयजल योजनेतून येळ्ळूर गावाला पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 60 लाख मंजूर झालेत. उदघाटन झालं टेंडर झाला काम सुरू करण्यासाठी सामान येऊन पडलं खुदाई झाली मात्र पाच उलटले तरी काम का सुरू व्हायला तयार नाही?कुणा लोक प्रतिनिधिच्या इशाऱ्यावर हे काम थांबवलं आहे का? असा सवाल उपस्थित करत जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी सहाय्यक अभियंते हंपीहोळी यांना चांगलेच धारेवर धरले.
शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रश्न विचारला.त्यावेळी अधिकाऱ्यांनी कोविड आणि पावसाने काम सुरू झालं नसल्याचे कारण पुढे केले त्यावर गोरल यांनी कोविड काळात पावसात स्मार्ट सिटी व इतर काम सुरू आहेत मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित केला त्यावर अधिकारी निरुत्तर झाले.
आगामी आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करायच्या तयारीत आहेत येळ्ळूर पाणी योजनेसाठी हा जिल्हा पंचायतीचा निधी असून काम सुरू न झाल्यास ठेकेदारा कडून दंड वसूल करा हवं या शिवाय हवं तर लोक प्रतिनिधींनी आणखी एकदा उदघाटन करावं मात्र जनतेची काम अडवू नये अशी इछा यावेळी रमेश गोरल यांनी व्यक्त केली.
गेल्या पाच महिन्या पूर्वी येळ्ळूर गावच्या पाणी समस्येवर जिल्हा पंचायत पेयजल योजनेतून 60 लाख कामाचं उदघाटन झालं होतं मात्र ठेकेदाराने समान टाकलाय टेंडर झाला आहे मात्र काम अद्याप सुरू झालेल नाही.शुक्रवारीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले व सदस्य गोरल यांनी हा मुद्दा उचलताच आगामी 8 दिवसांत काम सुरू करण्याचे अश्वासन देण्यात आले.