काँग्रेस पक्षाचे प्रशिक्षण शिबीर आणि आर एस एस चा काहीही एक संबंध नाही.आर एस एस सारखी संघटना काँग्रेस पक्षाला गरज नाही आम्ही त्यांच्या सारखे शत्रू तयार करत नाही असे मत काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य बी के हरिप्रसाद यांनी केले आहे. बेळगाव येथील काँग्रेस भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते. देशाच्या विकासासाठी कटिबद्ध काँग्रेस पक्षाची तत्वे ध्येय धोरणे समोर ठेऊन कार्यकर्त्यांना तयार करू असे ते म्हणाले. हातात लाठी घेऊन इतरांना मदत होईल आधार मिळेल असे काम करणारा काँग्रेस पक्ष आहे तर दुसरे लाठी हातात धरून इतरांची तोंड उघडण्याचे काम करत नाही.
के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना शिबीर घेत आहोत नुकताच प्रशिक्षणकेंद्र देखील तयार केलेले आहे त्या नुसारच कर्नाटक राज्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आर एस एस ने आमच्या कडूनच भरपूर काही शिकायला हवं आम्ही त्यांच्याकडून शिकायची गरज नाही ते लोक स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधातले आहे त्यांच अनुकरण करायची गरज नाही असेही त्यांनी नमूद केले. आमची लाठी काही जादू करणार नाही महात्मा गांधी यांनी हातात लाठी घेतली ती केवळ मदत करण्यासाठीच त्यामुळे आर एस एस लाठी हातात कश्याला घेतात हे जगाला माहित आहे स्वातंत्र्य योद्धयांच्या पाश्वभूमीवर सेवा दल काम करते असेही ते म्हणाले.
भाजपचे नेते अफिम गांजाच्या नशेतून घरातून बाहेर पडायला तयार नाहीत कोविड १९ वर नियंत्रण करण्यात साफ अपयशी ठरले आहेत झाकून ठेवलेले ड्रग्ज प्रकरणे आता बाहेर पडू लागली आहेत असाही आरोप त्यांनी केला.