रिसालदार गल्ली बेळगाव येथील तहसीलदार कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली असून ठिकठिकाणी डबक्याचे स्वरूप व तलावाचे स्वरूप दिसून येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून नागरिकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे.
संपूर्ण कार्यालयात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे नागरिक येताना आपण पाण्यातूनच जात असल्याचा अनुभव घेत आहेत. याची दखल तहसीलदार आर के कुलकर्णी घेणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
तहसीलदार कार्यालयात जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला पेन्शन वृद्धाप पेंशन यासह अनेक कामांसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पावसाळ्यात तहसीलदार कार्यालयात संपूर्ण पाणीच पाणी साचले होते तर पाऊस जाऊनही ही बरेच दिवस उलटले तरी अजूनही त्या ठिकाणी पाणीच पाणी आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
नुकतीच या कार्यालयाची पाहणी जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र आश्वासन अखेर काहीच करण्यात आले नाही. येथील गळती थांबवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.
मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा तातडीने येथील गळती थांबवावी व नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.