जैन महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून शिक्षण घेणाऱ्या अणिका बहेती या विद्यार्थिनीने बारावी शिक्षण पूर्ण केले. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानंतर तिला 91.16 टक्के गुण मिळाले होते. परंतु अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने पुनर्मुल्यांकन करण्याचा निर्णय अणिकाच्या शिक्षकांनी तसेच कुटुंबीयांनी घेतला.
पुनर्मुल्यांकनानंतर लक्षात आले कि, अणिकाचे ३ विषयातील १६ गुण कमी करण्यात आले होते. त्यामुळे तिच्या निकालामध्ये तफावत झाली होती.
पुनर्मुल्यांकनानंतर अणिकाचे गुण 94.17 टक्के झाले. यानुसार अणिका बारावी परीक्षेत बेळगावमध्ये ११व्या स्थानी पोहोचली आहे.अकरावी या विध्यार्थीनीला 98 टक्के गुण मिळाले होते.
मूल्यमापन करणाऱ्यांनी जर हा घोळ घातला नसता तर अणिका अव्वल विद्यार्थ्यांच्या यादीत आली असती. असे प्रकार अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतात.
मूल्यमापकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा चुकीच्या निकालांमुळे होत असलेले प्रकार टाळण्यासाठी पालकांनी जागरूक राहून आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे, असे आवाहन अणिकाचे वडील अनिल बहेती यांनी केले आहे.