अयोध्येत झालेल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी न्यायाधीश एस. के. यादव यांचे विशेष सीबीआय न्यायालय आज निकाल देणार आहे. या पार्शवभूमीवर बेळगावमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणातील बाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, साध्वी रिटब्रा, राज्यसभेचे खासदार विनय कटियार यांच्यासह एकूण ४९ जणांचा या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये समावेश आहे.
त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जावी, यासाठी संपूर्ण शहरात पोलीस फाटा तैनात करण्यात आला असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
४ एसीपी, १९ पीआय, २४ पीएसआय, ७८ एएसआय, ६३२ एचसी/पीसी, १२ सीएआर, आणि २ केएसआरपी अशा पद्धतीने पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान अफवा पसरविणे आणि शांतता भंग करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.