आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने २१ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मंगळवारी जारी केलेल्या नोटिसमध्ये मंत्रालयाने म्हटले आहे की, ऐच्छिक तत्त्वावर 9 ते 12 वर्गांच्या शाळा भरविल्या जाऊ शकतात. या धर्तीवर कर्नाटक सरकारने देखील अंलबजावणीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे.
केंद्राच्या सूचनेनुसार 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत केवळ कंटमेंट झोनबाहेरील शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तथापि, कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सदस्यांना शाळेत प्रवेश घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
शाळा सुरु करण्यापूर्वी शाळेतील वर्गखोल्या सॅनिटाईझ करण्याची सूचनाही देण्यात आली असून मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या कार्यप्रणालीनुसार कर्नाटक शिक्षण विभघग १२ किंवा १३ सप्टेंबर रोजी आपल्या राज्यासाठी कार्यप्रणाली जाहीर करेल, अशी माहिती कर्नाटक शिक्षण खात्याने दिली आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची लेखी संमती आवश्यक असल्याचेही केंद्राने म्हटले आई. तत्पूर्वी शाळा सुरु करण्याआधी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मतेही जाणून घेतली जाणार आहेत. असे केंद्र शासनाच्या कार्यप्रणालीत नमूद करण्यात आले आहे.