कांद्यावरील निर्यात केंद्र सरकारने बंद केले आहे. देशांतर्गत पिकवणारा कांद्याला भाव वाढत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांदा पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एपीएमसी येथे 40 ट्रक कांदा आयात झाला असला तरी निर्यात बंद असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवारी कांद्याचा दर साडेतीन हजार इतका पोचला होता. एपीएमसीमध्ये महाराष्ट्र येथून येणारा कांदा बंद असल्याने आता कर्नाटकातील कांदा येत आहे. मात्र हा कांदा कमी आवक असून त्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पंधराशे ते 2000 पर्यंत मिळणारा कांदा आता साडेतीन हजार च्या घरात जाऊन पोहोचला आहे तर रस्त्यावर विकणारे किरकोळ विक्रेत्यांनी हा कांदा 40 ते 45 रुपयांना प्रति किलो विकत आहेत.
त्यामुळे आता कांद्याचे दर भडकणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्नाटकातील कांदा आवक होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. कांद्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढणार असून यावरील निर्यात बंदीचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. सध्या नाशिक व इतर ठिकाणी झालेल्या पावसामुळे अनेक कांदा खराब झाला आहे. याचबरोबर कर्नाटकातही याचा फटका बसला आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार यात शंका नाही. बेळगाव एपीएमसी मध्ये रविवारी चाळीस ट्रक कांद्याची आवक झाली असली तरी निर्यातबंदीमुळे कांद्याचा दर वाढला आहे. आणखी काही दिवस असेच चालणार असे व्यापारी सांगताहेत. परिणामी सर्वसामान्यांना आता अधिक पैसे मोजावे लागणार यात शंका नाही.