कोरोनामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले. मात्र या वृत्तावर कुणाचाच विश्वास बसला नाही. विशेष करून बेळगावकरांना तर हे माहिती नाही. मात्र बेंगलोर येथे अधिवेशनासाठी गेलेल्या बेळगाव उत्तर आमदार अनिल बेनके त्यांना ही धक्कादायक बातमी समजली. तेव्हा त्यांची घालमेल आणि या बद्दल त्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
कुटुंब वेगळे असले तरी एकाच कुटुंबात वावरणारे आणि प्रत्येक कार्यात सहभागी होणारे अनिल बेनके याचबरोबर त्यांना राजकारणात आणणारे सुरेश अंगडी यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्यावरही आघात कोसळला आहे. मात्र त्यांचे कार्य पद्धती आणि त्यांनी केलेले कार्य आणि अनिल बेनके यांच्यातील नातेसंबंध अवर्णनीय आहे. त्यामुळेच जेव्हा केंद्रीय राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले तेव्हा आमदार अनिल बेनके यांनाही विश्वास बसला नाही. मात्र कोरोनाच्या मारीत त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगी असल्याचेही मत अनिल बेनके यांनी व्यक्त केले आहे.
एक सच्चा कार्यकर्ता हरपला असे सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. समाजकारण राजकारण आणि त्यांची नम्रता ही अवर्णनीय आहे. त्यांचा प्रवास खडतर असला तरी त्यांच्या प्रत्येक कार्यात मला सामावून घेऊन राजकारणात आणले माझे आदरणीय व्यक्तिमत्व हरपले हा सगळ्यात मोठा घात माझ्या मनावर झाला आहे. यासंबंधी प्रत्यक्ष माहिती घेऊन जेव्हा ही सत्य घटना खरी ठरली त्यावेळी माझ्या मनाची लाही लाही झाली. सध्या अधिवेशन सुरू आहे.
त्यामुळे मी बेंगलोर येथेच या बातमी संदर्भात सखोल चौकशी केली. मात्र जेव्हा सत्य घटना उघडकीस आली त्यावेळी मात्र माझ्या हृदयाचे ठोके चुकले आहेत. माझे आदरणीय आणि राजकारणातील गुरु यांच्या निधनामुळे जो काही दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो सहन करण्यासाठी मला शक्ती द्यावी असेच मत अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
आमदार अनिल बेनके आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची जवळीक बेळगावकर जनतेला माहीत आहे. सध्या अधिवेशन सुरू असल्याने आमदार बेनके बंगळुरू मध्ये आहेत अंगडी यांच्या निधनाच्या बातमीने बेनके यांना धक्का बसला असून त्यांनी अत्यंत दुःखद शब्दात श्रद्धांजली अर्पण केली आहे या शिवाय अंगडी यांच्या बाबतीतल्या काही आठवणी ताज्या केल्या आहेत.पहा फक्त बेळगाव Live वर
#sadcandolance
#sureshangadi
#mosrailway
#belgaumlive
#mlaanilbenake
आमदार अनिल बेनके आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची जवळीक बेळगावकर जनतेला माहीत आहे. सध्या अधिवेशन सुरू असल्याने…
Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 23, 2020