आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने हा वीजपुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी सहा या वेळेत हा वीजपुरवठा खंडित होणार आहे.
याच दरम्यान दिनांक 27 रोजी दुरुस्तीसाठी आटोनगर औद्योगिक वसाहत व काकती परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हा वीजपुरवठा ठप्प राहणार आहे.
के आयए डी बी आटोनगर औद्योगिक वसाहत सिद्धेश्वर नगर फाउंड्री परिसर टाटा पावर बर्फवाला आशियान इंडस्ट्री आटोनगर एक्झिबिशन सेंटर के एस आर टी सी डेपो प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय यादव इंडस्ट्रीज केएसबी कॉलनी रामतीर्थ मंदिर बसवनकोळ मुत्यानट्टी काकती औद्योगिक वसाहत काकती रहिवासी वसाहत परिसर आदी ठिकाणी हा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉममच्या वतीने करण्यात आले आहे.