Wednesday, December 25, 2024

/

काळजी नको यंदा बसपास दरात वाढ नाही

 belgaum

विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सवलतीच्या दरातील बसपासमध्ये कोणतीही दरवाढ केली जाणार नाही, अशी गवाही परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे. त्यामुळे बसपास दरवाढीबाबत पालकांनी अनावश्यक काळजी करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या बसपासदरात वाढ करण्यात येणार आहे, अशा अफवा पसरविण्यात येत आहेत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे लक्ष्मण सवदी यांनी कळविले आहे.

दरवाढ करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसून मागील शैक्षणिक वर्षातील दराप्रमाणे यंदाही बसपास वितरित केले जातील, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.