डॉ. मनजित जैन यांची नीट २०२० च्या परीक्षांसाठी शहर समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अधिनियम (2019) च्या कलम नुसार, राष्ट्रीय पात्रता क्रम प्रवेश परीक्षा म्हणजेच एनईईईटी यूजी २०२० ही देशातील सर्व वैद्यकीय संस्थांमधील, सर्व पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक समान सामान्य प्रवेश परीक्षा म्हणून घेण्यात येते.
ही परीक्षा रविवार दि. 13 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता संपूर्ण देशभरातील 155 विविध शहरांमध्ये घेण्यात येईल.
या परीक्षा सुरळीत व नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी कर्नाटक – जैन हेरिटेज स्कूल या नामांकित शाळेचे प्राचार्य डॉ. मनजीत जैन यांची शहर समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. जैन जेईई मुख्य परीक्षांचे जिल्हा प्रभारी म्हणून सेवा बजावत आहेत.
बेळगाव जिल्ह्यात २१ परीक्षा केंद्रे आहेत. 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीत जेईई मुख्य परीक्षा घेण्यात आल्या असून कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्रांवर मार्गदर्शक तत्त्वे, सुरक्षा उपाय आणि नियमांचे पालन केले जात आहे.
हे निरीक्षण करण्यासाठी शहर समन्वयक यांना प्रशिक्षण दिले जाते. डॉ. मनजीत हे सर्वात तरुण शहर समन्वयक म्हणून गणले जाणार असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.