दरवर्षी पतंगाचा मौसम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. मागील आठवड्यात मांजामुळे दुचाकीस्वार जखमी झाला यावरून मांजा तयार करणे आणि विक्री करणे यावर बंदी घालून त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला त्यानंतर आता पटांगणावर तिरंग्याचा वापर करून असे पतंग विक्री करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत.
अशा पतंगांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यता आहे, यामुळे राष्ट्रध्वज असणाऱ्या पतंगावर बंदी घालाबी अशी मागणी होत आहे.
सध्या लहान मुलांसहित युवावर्ग सर्वत्र पतंग उडवीत असतानाचे चित्र दिसून येत आहे. मात्र काही व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी राष्ट्रध्वजासारखा तिरंगी पतंग बनवून त्याची विक्री करत आहेत. अशा पतंगीवर बंदी घालावी अशी मागणी होत आहे. अशा पतंग विक्री करणार्यावर बंदी घालून राष्ट्रध्वजाच्या रंगात असणारे पतंग जप्त करावेत व राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवावा अशी मागणी करण्यात येत आहे.
पतंग खराब झाला तर त्याचा कागद जमीनीवर किंवा इतरत्र गटारीत किंवा रस्त्यावर पडतो. कचऱ्यात किंवा इतर ठिकाणी पडण्याचीही शक्यता आहे.
या पतंगावर तिरंगा ध्वज असून मेरा भारत महान असा मजकूर लिहिण्यात आले आहे. अशा गोष्टींमुळे भावना दुखावल्या जातात, त्यामुळे अशा पतंगांची विक्री करू नये, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ज्याप्रमाणे मांजा विक्री करणाऱ्यांना आळा घालण्यात आला आहे. त्याच प्रकारे असे पतंग विक्री करण्यावरही बंदी घालावी आणि राष्ट्र हिताच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे.