दिवंगत खासदार अंगडींच्या कुटुंबियांनी भाजपा हायकमांडकडे उमेदवारी मागावी, असे वक्तव्य भाजपचे कर्नाटक राज्य अध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी केले आहे.
आज बेळगावमध्ये सुरेश अंगडींच्या निवासस्थानी भेट देऊन अंगडी कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. यावेळी सुरेश अंगडी यांचे मामा लिंगराज पाटील यांनी नलिन कुमार कटील यांच्याशी बोलताना त्यांनी अंगडी यांच्या पत्नीसाठी उमेदवारी देण्यासाठी आपण हाय कमांड कडे मागणी करावी अशी मागणी केली.
बेळगावमध्ये भाजप पक्ष बळकट करण्यासाठी सुरेश अंगडी यांनी मोलाचे योगदान दिले असून, पक्ष बळकटीसाठी त्यांनी पाय रोवण्याचे काम केले आहे. शिवाय त्यांनी पक्षाची सेवाही खूप केली आहे. त्यांच्या चाहत्यांकडून अंगडी कुटुंबियातील सदस्यांला उमेदवारी द्यावी अशी, मागणी होत आहे.
अंगडी कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. लोकशाहीचा खून करण्याची मानसिकता काँग्रेस पक्षात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सत्ता गमावल्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण करून वातावरण बिघडविण्याचे कार्य काँग्रेस कडून केले जात असून, काल शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून सरकारविरोधात भडकविण्याचे कार्य काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. असेही ते म्हणाले.
एकाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्या ना बघू किती धाडस आहे या सर्व नेत्यांना मध्ये फक्त त्यांनाच का
कार्यकर्ता का मंत्री हुं नये द्या एकद्या गरीब माणसाला तिकीट मग म्हणू यांना खरंच गरिबांची काळजी आहे